Learn English

Lesson 3:- Verbs |LEARN ENGLISH

क्रियापदे

साहाय्यकारी क्रियापदांचा उपयोग तुम्हाला इंग्रजी बोलताना लिहिताना टाळता येणार नाही. त्यामुळे सर्व साहाय्यकारी क्रियापदांबद्दल व्यवस्थित माहिती घ्यायला आणि हळूहळू त्या माहितीचे सवयीत रूपांतर करायला पर्यायच नाही.

साहाय्यकारी क्रियापदांच्या सविस्तर अभ्यासाची सुरुवात आपण करत आहोत

1.CAN

Can या साहाय्यकारी क्रियापदाचा उपयोग प्रामुख्याने योग्यता व्यक्त करण्यासाठी होतो. पण परवानगी देण्यासाठी/घेण्यासाठी व शक्यता व्यक्त करण्यासाठी सुद्धा Can चा उपयोग केला जाऊ शकतो.

Can या साहाय्यकारी क्रियापदाचा मराठीत सर्वसाधारण अर्थ शकतो, शकते, शकतात असा होतो. Can सोबत क्रियापदाचे पहिले रूप येते.

पुढील उदाहरणांवरून Can चा उपयोग अगदी स्पष्ट होईल मराठीची वाक्ये. इंग्रजीची वाक्ये

१) तू जाऊ शकतोस.-You can go

२) तू येऊ शकतोस.-You can come.

३) तू इथे बसू शकतोस. You can sit here.

४) मी बोलू शकतो. -I can speak.

५) मी इंग्रजी बोलू शकतो. -I can speak English,

६) मी ही पेटी उचलू शकतो. – I can lift this box.

७) मी हे गणित सोडवू शकतो. -I can solve this problem.

८) तू हे स्वतः करू शकतोस. – You can do this yourself.

९) तू मला या नंबरवर फोन करू शकतोस. -You can telephone me on this number.

१०)तो घरी असू शकतो.- He can be at home.

११) तो कुठल्याही क्षणी येऊ शकतो.- He can come at any moment.

१२) तू या भिंतीवरून उडी मारू शकतोस का?- Can you jump over this wall?

१३) ही बातमी खरी असू शकते. -This news can be true.

१४) ही बातमी खरी असू शकते का?- Can this news be true?

१५) धूम्रपानामुळे कर्करोग होऊ शकतो.– Smoking can cause cancer.

१६) तू पोहायला जाऊ शकतोस पण सातच्या आधी परत ये.-You can go swimming but get back before seven.

१७) आपण हे एका दिवसात करू शकतो का? -Can we do this in one day?

१८) मसाला कुटण्यासाठी तुम्ही खलबत्ता वापरू शकता. -You can use a pestle and mortar to crush the spices.

१९) मी तुला कशी मदत करू शकतो? -How can I help you?

२०) आपण या चुकीची पुनरावृत्ती कशी -How can we avoid the repetition of this mistake?

२१) हे कोण करू शकतो?- Who can do this?

२२) मी काय करू शकतो?- What can I do?

२३) तू कोणते वाद्य वाजवू शकतोस?- Which instrument can you play?

२४) तू तुझा श्वास किती वेळ रोखून धरू -How long can you hold your breath?

२५) मला दिसतंय तू थकलेला आहेस. I can see you are tired.

2.COULD

• Could सोबत क्रियापदाचे पहिले रूप येते. भूतकाळातील योग्यता व्यक्त करण्यासाठी Could वापरतात.

१) शाळेत असताना मी अस्खलित इंग्रजी बोलू शकत होतो. When I was at school I could speak English fluently.

२) दोन वर्षांच्या आधीपर्यंत मी चश्म्याशिवाय वाचू शकत होतो/मला चश्म्याशिवाय वाचता येत होतं. I could read without glasses until two years ago.

आता पुढील वाक्य पहा :-

पाच वर्षांच्या नियमित व्यायामानंतर काल मी शंभर किलो वजन उचलू शकलो. या वाक्यात भूतकाळात करू शकलेल्या एका विशिष्ट क्रियेबद्दल बोललेलं आहे. अशा वेळेस could वापरू नये.

– was able to / were able to वापरावे :- After five years’ regular exercise, I was able to lift hundred kilos yesterday.

पण पुढील वाक्य मात्र could वापरून करता येईल :-

तरूण असताना मी शंभर किलोपेक्षा जास्त वजन उचलू शकत होतो. When I was young, I could lift more than hundred kilos. मराठीत जेव्हा आपण शकला नाही, शकलो नाही, शकले नाही असं म्हणतो तेव्हा या ‘शकला, शकलो’ साठी could वापरता येईल.

१) तू मला तुझी अडचण का सांगितली नाही? मी तुला मदत करू शकलो असतो.- Why didn’t you tell me your problem? I could have helped you.

२) तो आपली वाट पाहू शकला असतो,- He could have waited for us.

३) मी त्याला मारू शकलो असतो. – I could have beaten him.

४) तो तुला काही पैसे उसने देऊ शकला असता. – He could have lent you some money.

५) त्याला ती नोकरी मिळू शकली असती पण त्याने त्यासाठी अर्ज केला नाही.- He could have got that job but he didn’t apply for it.

६) तू मला हे काल सांगू शकला असता.- You could have told me this yesterday.

७) मी काय करू शकलो असतो? – What could I have done?

८) तो आपली मदत करू शकला असता का? – Could he have helped us?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *