Learn English

Lesson 1:- Types of sentences |LEARN ENGLISH

वाक्यांचे प्रकार

वाक्यांचे मुख्य प्रकार चार आहेत –

जे कोणतं वाक्य तुम्ही बोलता ते वाक्य चारपैकी एका प्रकारात येतं. म्हणजे तुम्हाला बोलण्यासाठी लागणार आहेत चारच प्रकारची वाक्ये – आणि एकदा तुम्ही स्वत: पाहून घेतलं की ही चारही प्रकारची वाक्ये इंग्रजीमधे बनवणं कसं अगदी सोपं आहे.

तर मग मला तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज राहणार नाही की इंग्रजीमधे बोलणंही सोपं आहे. कारण तुम्हाला आधीच कळलंय की बोलण्यासाठी लागतात ‘वाक्ये’. म्हणून वाक्ये सोपी म्हणजे बोलणं सोपं!

आता वाक्यांच्या प्रकारांची नावे पहा :-

१) विधानार्थी वाक्ये (Assertive Sentences)

२) प्रश्नार्थी वाक्ये (Interrogative Sentences)

3) आज्ञार्थी वाक्ये(Imperative Sentences)

४) उद्गारवाचक वाक्ये (Exclamatory Sentences)

याशिवाय होकारार्थी वाक्य (Affirmative sentence) व नकारार्थी वाक्य (Nega- tive sentence)

हेही प्रकार तुम्ही ऐकलेले आहेत. पण हे वाक्यांचे मुख्य प्रकार नाहीत.

कारण विधानार्थी वाक्यच होकारार्थी असतं किंवा नकारार्थी असतं. प्रश्नार्थी वाक्यही होकारार्थी किंवा नकारार्थी असतं. जसं तुम्ही विचारलं कोण आला? तर हे वाक्य होकारार्थी झालं आणि कोण आला नाही? हे वाक्य नकारार्थी. शेवटी दोन्ही वाक्ये प्रश्नार्थीच आहेत. असंच आज्ञार्थी

वाक्यही होकारार्थी किंवा नकारार्थी असू शकतं. म्हणून वाक्यांचे प्रकार आहेत चारच. आता या चारही प्रकारच्या वाक्यांबद्दल आपल्याला हळूहळू सगळी माहिती शिकत जायची आहे.

वाक्यांच्या दृष्टीने आता सुरू होणारं पुढचं प्रकरण खूप महत्त्वाचं आहे. या पुढच्या प्रकरणाचं नाव आहे….

आता This my book is आणि This is my book या दोन्ही वाक्यांमधील शब्द तेच आणि तेवढेच असले तरी This my book is हे वाक्य चुकलं.

कारण This my book is या वाक्यातील शब्दांचा क्रम चुकलेला आहे. किंवा शब्दांची मांडणी चुकलेली आहे असंही म्हणता येईल. किंवा वाक्याची रचना चुकली असं म्हणा – काहीही म्हटलं तरी अर्थ एकच. यावरून वाक्य बरोबर होण्यासाठी शब्दांसोबत दुसऱ्या कुठल्या गोष्टीची गरज आहे ते आपल्या लक्षात येतं. ती दुसरी गोष्ट म्हणजे वाक्याची रचना.

इथपर्यंत आपण जे बोललो त्यावरून आपल्याला पुढीलप्रमाणे एक समीकरण बनवता येईल :-

शब्द + रचना : वाक्य.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *