Learn English

Lesson 5:- Negative sentences |LEARN ENGLISH

नकारार्थी वाक्ये

नकारार्थी वाक्यात ज्याप्रमाणे मराठीत नाही, नव्हता, नसेल, नको असे शब्द वापरले जातात त्याप्रमाणे इंग्रजीमध्ये कोणते शब्द येतात व वाक्यात कोणत्या जागेवर येतात ते आपल्याला या प्रकरणात शिकायचं आहे.

तुम्हाला माहीत आहे इंग्रजीमधे नकारार्थी वाक्यात प्रामुख्याने not हा शब्द वापरला जातो. पण no, never, nothing असे शब्दही नकारार्थी वाक्यात येतात. हे सर्वच शब्द वापरून आपल्याला वाक्ये करायची आहेत. सुरुवात आपण not पासून करू. not ची वाक्यातील सर्वसाधारण जागा लक्षात घेण्यासाठी दोन प्रमुख रचनांकडे आपल्याला लक्ष द्यावं लागेल. एक रचना विधानार्थी वाक्याची व दुसरी प्रश्नार्थी वाक्याची.

१) नकारार्थी विधानार्थी वाक्याची रचना :-

(कर्ता + साहाय्यकारी क्रियापद + not + क्रियापद )

या रचनेतून not ची विधानार्थी वाक्यातील जागा लक्षात येते. आणि रचनेत साहाय्यकारी क्रियापदाच्या खाली ‘एकच शब्द’ असं जे लिहिलेलं दिसत आहे त्याचा अर्थ साहाय्यकारी क्रियापदामधे एकापेक्षा जास्त शब्द असले (जसे, will be, will have, could have) तरी त्या ठिकाणी साहाय्यकारी क्रियापदामधला पहिला एकच शब्द येईल. आणि मग not a not नंतर उरलेला शब्द येईल. म्हणजे वरील रचनेच्या वाक्यात will be वापरायचे असल्यास तुम्ही

He + will + not + come.

+कर्ता + सा. क्रि. + not + क्रियापद….

उदाहरणे :-

* वाक्याचं होकारार्थी – मी तिथे जाईन’. म्हणजे वाक्य साध्या भविष्यकाळाचं. म्हणजे साहाय्यकारी क्रियापद will)

१) मी तिथे जाणार नाही. – I will not go there.

२) मी तिथे गेलो नव्हतो. (होकारार्थी ‘गेलो होतो’ – म्हणजे ‘पूर्ण भूतकाळ’ – म्हणजे had) I had not gone there.

३) मी तिथे जाऊ शकत नाही. (होकारार्थी ‘जाऊ शकतो’; ‘शकतो’ म्हणजे can) I cannot go there.

४) तू तिथे जायला नको. (होकारार्थी ‘जायला पाहिजे’ – म्हणजे should) You should not go there.

५) तू तिथे जायला नको होतं. (होकारार्थी ‘जायला पाहिजे होतं’ म्हणजे should have येईल. पण आपण आत्ताच वर शिकल्याप्रमाणे should have not येणार नाही – should not have येईल) You should not have gone there.

६) तो अद्याप आलेला नाही. (होकारार्थी ‘आलेला आहे’ म्हणजे ‘पूर्ण वर्तमानकाळ’ म्हणजे have किंवा has + क्रियापदाचे तिसरे रूप. सध्या कर्ता he असल्यामुळे has येईल) He has not come yet.

७) तो तिथे पोहोचलेला नसेल. (होकारार्थी ‘पोहोचलेला असेल’ म्हणजे ‘पूर्ण भविष्यकाळ’ म्हणजे will have + क्रियापदाचे तिसरे रूप) हि He will not have reached there.

८) त्याला बरं वाटत नव्हतं. (होकारार्थी वाटत होतं’ म्हणजे ‘चालू भूतकाळ’ म्हणजे was / were + क्रियापदाला ing) He was not feeling well.

९) मी तुला विचारत नाही आहे/नाहीये. (होकारार्थी ‘विचारत आहे’. म्हणजे ‘चालू वर्तमानकाळ’. म्हणजे am/is/are + क्रियापदाला ing) I am not asking you.

१०) तो इथे आला नव्हता. (होकारार्थी ‘आला होता’ – म्हणजे ‘पूर्ण भूतकाळ’ – म्हणजे had + क्रियापदाचे तिसरे रूप) He had not come here.

११) मी तिथे जाऊ शकणार नाही. (होकारार्थी जाऊ शकेल’ म्हणजे will be able to) I will not be able to go there. (not च्या जागेकडे लक्ष द्या).

१२) तो इथे येत नाही. (या वाक्याचे होकारार्थी तो इथे येतो’) म्हणजे हे वाक्य साध्या वर्तमानकाळाचं झालं.

साध्या वर्तमानकाळाच्या प्रश्नार्थी वाक्यात do/does ही साहाय्यकारी क्रियापदे वापरली जातात असं आपण ‘प्रश्नार्थी वाक्ये’ या प्रकरणात शिकलो. 2 सध्या वर्तमानकाळाच्या नकारार्थी वाक्यात सुद्धा हीच साहाय्यकारी क्रियापदे (do, does) वापरली जातात. do, does चा फरकही आपण पाहिलेला आहेच. सध्या कर्ता he असल्यामुळे does येईल. = He does not come here.

१३) मी तिथे जात नाही. (होकारार्थी मी तिथे जातो’. वाक्याचा काळ साधा वर्तमानकाळच’. २) नकारार्थी प्रश्नार्थी वाक्याची रचना :- रचना A:- साहाय्यकारी क्रियापद + कर्ता + not + क्रियापद…? (एकच शब्द)

किंवा साहाय्यकारी क्रियापद +n’t + कर्ता + क्रियापद…? (एकच शब्द)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *