Lesson 6:- Obedient sentences |LEARN ENGLISH
आज्ञार्थी वाक्य
आज्ञार्थी वाक्यांच्या अभ्यासाची सुरुवात आपण आज्ञार्थी वाक्यांच्या सर्वात साध्या परंतु सर्वात प्रमुख रचनेपासून करत आहोत.
क्रियापदाचे पहिले रूप + …… या रचनेचा अर्थ आहे आज्ञार्थी वाक्याची सुरुवात क्रियापदाच्या पहिल्या रूपापासून होते. आणि क्रियापदानंतर पुढे जे असेल ते येते.
१) जा = Go.
२) ये = Come.
३) ऐक = Listen.
४) विचार करा = Think.
५) थांब = stop.
ही एकेका शब्दाची वाक्ये झाली. यावरून लक्षात येतं की एका शब्दाचंही वाक्य होऊ शकतं. तसं वाक्यात सहसा एकापेक्षा जास्तच शब्द असतात. पण एका शब्दातूनही पूर्ण अर्थ निघत असेल तर तो एक शब्द वाक्यच होईल. जसं, आपण एखाद्याला ‘जा’ असं म्हटलं तर ऐकणाऱ्याला त्यातून पूर्ण अर्थ समजतो आणि तो जातो (किंवा जात नाही – पण त्याला अर्थ समजतो).
म्हणून ‘जा’ हे वाक्य झालं. आता पुढची उदाहरणे
६) पुन्हा विचार करा. Think again.
७) मला सांग. Tell me.
८) सांग मला, – Tell me.
९) मला तुझी अडचण सांग. – Tell me your difficulty.
१०) त्याला विचार, Think of him
११) हा कचरा फेकून दे/द्या. Throw away this rubbish.
१२) बोर्डाकडे बघा. Look at the board.
१३) मेणबत्ती विझव. Blow out the candle.
१४)खिडकी बंद कर आणि खिटी लाव, Close the window and draw the bolt.
१५) हे पुस्तक टेबलावर ठेव.. Put the book on the table.
१६) पुस्तक बंद कर आणि माझं ऐक. Close the book and listen to me.
१७) थोडं समोर ये आणि या रेषेवर उभा रहा. come forward a bit and stand a on this line.
१८) रस्ता ओलांडण्यापूर्वी दोन्हीकडे पहा. Look both ways before crossing the road.
१९) तुझी खुर्ची (थोडी) पुढे घे. Move your chair (a bit) forward(s).
२०) खुर्चीवरून तुझा पाय काढ. ENTS Take your foot off the chair.
२१) केकचे दोन तुकडे कर. Cut the cake in half.
२२) सुटे पैसे राहू द्या. Keep the change.
२३) चला मुलांनो, कारमधे बसा. Come on, children, get in / into the car.
२४) नऊ नंतर मला घरी फोन कर. Phone me at home after
२५) चल पटकन्. Hurry (up).
२६) सरळ उभा रहा. Stand up straight.
२७) ते माझ्यावर सोड. Leave it to me.
२८) मला एकटं सोड. Leave me alone.
२९) हा कोट त्या खुंटीवर टांग. Hang this coat on that peg.
३०) खिसेकापूंपासून सावधान (रहा). Beware of pickpockets.
३१) माझ्यासाठी जागा ठेव. Keep a seat for me.
३२) निश्चिंत रहा. Rest assured.
३३) हे पत्र कचरापेटीत टाक. Put this letter in the dust-bin.
रचना :- Don’t/Do not + क्रियापदाचे पहिले रूप
ही नकारार्थी आज्ञार्थी वाक्याची रचना आहे. एखादी क्रिया करू नको/करू नका/ करू नकोस असे म्हणण्यासाठी ही रचना वापरली जाते.
उदाहरणे :-
१) जाऊ नकोस. Don’t go / Do not go.
२) येऊ नकोस. Don’t.come.
३) इथे येऊ नकोस. Don’t come here.
४) इथे पुन्हा येऊ नकोस. Don’t come here again.
५) ओरडू नकोस. Don’t shout.
६) हसू नकोस. Deparan Don’t laugh.
७) घाई करू नकोस. Don’t hurry.
८) घाबरू नकोस. Don’t fear.
९) मला काहीच सांगू नकोस. Don’t tell me anything.
१०) मला दोष देऊ नकोस. Don’t blame me.
११) असं समजू नकोस. Don’t think so.
१२) तो जुना विषय आता काढू नकोस. Don’t bring up that old subject now.
१३) तिथे बाहेर पावसात उभा राहू नकोस. Don’t stand out there in the आत ये इथे. rain. Come in here.
१४) गवतावर बसू नकोस. Don’t sit on the grass.
१५) निराश होऊ नकोस, Don’t get disappointed.
विनंती करण्याच्या पद्धती विनंती करण्याची एक पद्धत म्हणजे आज्ञार्थी वाक्याच्या सुरुवातीला Please हा शब्द वापरला जातो.
१) कृपया मला मदत कर. Please help me.
२) कृपया मला मदत करू नकोस. Please don’t help me.
३) जरा रस्त्यातून सरका. Please move out of the way.
४) कृपया गवतावर चालू नका/चालू नये. Please do not walk on the grass.
५) कृपया व्यवस्थापकाकडे लेखी अर्ज करा. Please apply in writing to the manager.
३) कृपया इथे उभा राहू नकोस. Please don’t stand here.
3) कृपया ती खिडकी उघडी ठेवू नका. Please don’t keep that window open.
८) कृपया/जरा दार बंद करा. Please shut the door.
३) कृपया हसू नकोस/नका. Please don’t laugh.
I wonder / I was wondering + if + chat + could / might + कि. पहिले रूप…
या रचनेने सुद्धा विनंती केली जाऊ शकते. यातून बोलणाऱ्याचा संकोच व्यक्त होतो. पहा :-
१) मी पाटील साहेबांशी बोलू शकतो का? I wonder / I was wondering if I could speak to Mr Patil.
२) मी तुमचा फोन वापरू शकतो का? I wonder if I could use your phone.
३) मी तुझी नवीन सायकल चालवून पाहू (शकतो) का? I was wondering if I could try out your new bike.
Would you mind + क्रियापदाला ing….? ही सुद्धा विनंती करण्याची एक पद्धत आहे. पहा :-
१) Would you mind speaking a bit loudly, please? Janw थोडं मोठ्याने बोलण्याचा त्रास कराल का/बोलू शकाल का?
२) Would you mind sitting here? तुमची इथे बसायला हरकत आहे का/ इथे बसाल का?
3) Would you mind my sitting here? मी इथे बसलो तर तुमची काही हरकत आहे का?
४) Would you mind not sitting here? ? तुम्ही इथे नाही बसले तर चालेल का?
५) Would you mind not smoking? तुम्ही धूम्रपान केलं नाही तर चालेल का? (not च्या जागेकडे लक्ष द्या.)