Lesson 7:- Exclamation Sentence |LEARN ENGLISH
उद्गारवाचक वाक्ये
वाक्यांच्या चार मुख्य प्रकारातील हा चवथा आणि शेवटचा प्रकार. इतर प्रकारांच्या तुलनेत या प्रकारची वाक्ये कमीच बोलली जातात. पण बोलली तर जातातच. त्यामुळे शिकावं तर लागेलच.
उद्गारवाचक वाक्ये इंग्रजीमधे प्रामुख्याने दोन प्रकारे सुरू होतात. एक what पासून व दुसरं how पासून. आता what पासून सुरू होणाऱ्या आणि how पासून सुरू होणाऱ्या उद्गारवाचक वाक्यांच्या सर्वसाधारण रचना लक्षात घेऊन आपण उद्गारवाचक वाक्यांच्या अभ्यासाला सुरुवात करू:-
१) What + (a / an) + (विशेषण) + नाम + (कर्ता + क्रियापद)…..!
२) How + विशेषण/क्रियाविशेषण + कर्ता + क्रियापद….!
वर what च्या रचनेत काही भाग कंसात आहे. हा कंसातील भाग वाक्यात नसूही शकतो. पण जेव्हाही असेल तेव्हा वाक्यात कोणत्या जागेवर असेल ते दाखवण्यासाठी रचनेत त्याचा उल्लेख केलेला आहे.
जसे काही उद्गारवाचक वाक्ये वरीलपैकी दोन्ही रचना वापरून केली जाऊ शकतात.
१) किती सुंदर कुत्रा आहे! -What a lovely dog! & How lovely the dog is!
२) किती भयानक रात्र आहे!- What a horrible night it is! & How horrible the night is!
पण कोणतेही उद्गारवाचक वाक्य अशा दोन्ही प्रकारे करता येणार नाही. कारण काही उद्गारवाचक वाक्ये What पासून सुरू करता येत नाहीत आणि काही उद्गारवाचक वाक्ये How पासून सुरू होऊ शकत नाहीत.पुढचे दोन नियम लक्षात घ्या :-
१) उद्गारवाचक वाक्यात नाम असेल तरच उद्गारवाचक वाक्याची सुरुवात What पासून करता येते.
२) उद्गारवाचक वाक्यात विशेषण किंवा क्रियाविशेषण असेल तरच उद्गारवाचक वाक्याची सुरुवात How पासून करता येते.
टीप :- नाम, विशेषण, क्रियाविशेषण या शब्दांचा अर्थ माहीत नसल्यामुळे वरील नियम किंवा रचना समजायला अडचण येत असल्यास आधी शब्दांच्या जाती या प्रकरणाचा अभ्यास करू शकता. आता खालच्या उदाहरणांवरून वरची रचना व वरील नियम स्पष्ट होतीलच.
१) काय योगायोग आहे! = What a coincidence!
हे इंग्रजीचे वाक्य What पासून सुरू झाले – मराठीच्या वाक्यात काय’ हा शब्द असल्यामुळे नाही तर वरच्या नियमानुसार. वाक्यात विशेषण किंवा क्रियाविशेषण नसल्यामुळे या वाक्याची सुरुवात How पासून होणं शक्य नव्हतं.
२) किती आळशी आहेस तू! How lazy you are!
How+ विशेषण + कर्ता क्रियापदा हे इंग्रजीचे वाक्य How पासून सुरू झाले . मराठीच्या वाक्यात किती हा शब्द असल्यामुळे नाही तर परत वरच्या नियमानुसार. या वाक्यात नाम नसल्यामुळे वाक्याची सुरुवात What पासून होणं शक्य नव्हतं. उद्गारवाचक वाक्यांच्या बाबतीत मराठीतील काय किती नुसार इंग्रजीत what / how येत नाही.
३) काय मूर्ख माणूस आहे! What a fool!/ What a foolish person!
४) काय सुंदर ड्रेस आहे! What a lovely dress!
५) काय विचित्र योगायोग आहे! What a strange coincidence!
६) काय कल्पना आहे! What an idea!
७) काय योजना आहे! What a plan!
८) किती मूर्खपणाची योजना आहे! What a foolish plan!
९) किती छान कल्पना आहे! What a great idea!
१०) काय/कसला मूर्खपणा आहे। What nonsense! Verma
११) काय सुंदर पर आहे। What a lovely house!
१२) काय नाक आहे त्याचं! What a nose he has!
१३) काय डोकं आहे त्याचं! What mind he has!
१४) किती छान ड्रेस घातलेला आहेस तू! What a lovely dress you are wearing!
१५) काय विचित्र विचार आहेत तुझे! What strange thoughts you have got!
१६) किती विचित्र कपडे घातलेले आहेस तू! What strange clothes you are wearing!
१७) काय आळशी मुलगा आहेस तू! What a lazy boy you are!
१८) काय आळशी मुलगा आहे! What a lazy boy!
१९) किती सुंदर दृश्य आहे! bomo What a beautiful spectacle!
२०) किती थंड आहेस तू! How cold you are!
२१) किती थंड आहेत तुझे हात! How cold your hands are!
२२) किती लठ्ठ झाला आहेस तू! How fat you have grown/ become!
२३) किती मूर्खपणाची योजना आहे त्याची! How foolish his plan is! for his.
२४) किती अस्खलित बोलतो तो! How fluently he speaks!
२५) किती मोठ्याने बोलतोस तू! How loudly you talk!
२६) किती पटकन् दिवस निघून गेले आहेत! How quickly the days have passed!
२७) किती पटकन् दिवस निघून जात आहेत! How quickly the days are passing!
२८) किती पटकन दिवस निघून जातात! How quickly the days pass!