Lesson 8:- Answers and responses |LEARN ENGLISH
पाठ ८:- उत्तरे आणि प्रतिसाद
१) So we will meet at 7.00, shall we?
तर आपण सात वाजता भेटू, ठीक आहे?(~Agreed / Okay. ठीक आहे.)२) Is he coming alone? तो एकटा येत आहे का?
~I think not. मला नाही वाटत.
~I think so. असं वाटतं मला.
३) Are you feeling tired?
तुला थकल्यासारखं वाटत आहे का?
Not a bit.
मुळीच नाही/अजिबात नाही.
४) It looks as if England are going to win.
असं दिसतं की इंग्लंड जिंकणार आहे.
Who cares?
कोणी का जिंकत नाही मला काय करायचं?
५) Could you lend me Rs.50?
तू मला ५० रुपये उसने देऊ शकतोस ।
~ Certainly. हो, नक्कीच.
Certainly not. अजिबात नाही /निश्चितच नाही.
६) Hari, come over here this minute.
हरी, ताबडतोब इकडे ये,
~ Coming Mom/Dad
. आलो आई / बाबा.
७) How is your headache?
तुझी डोकेदुखी कशी आहे?
~Oh, it comes and goes. येत जात असते.
c) Could you translate this passage by 4 o’clock, please?
चार वाजेपर्यंत या उताऱ्याचं भाषांतर करू शकाल का जरा?
Consider it done. झालं (च) समजा.
९) What is the meaning of this word?
या शब्दाचा अर्थ काय आहे?
~Idon’t know, look it up in the dictionary.
मला माहीत नाही, डिक्शनरीत पाहून घे.
१०) How much does this book cost?
हे पुस्तक केवढ्याचं आहे?
(It costs) Rs. 35. पस्तिस रुपयांचं आहे.
११) Why are you asking this?
तू हे का विचारत आहेस? ~Oh, just (idle curiosity). असंच/सहज.
१२) What is today’s date? What date is it today?/What is the date (today)? आज तारीख काय आहे?
– It is the first of August (today). आज १ ऑगस्ट आहे.
१३) Are you going shopping this evening?
तू आज सायंकाळी खरेदीला जात आहेस का?
It (all) depends on the rain. पावसावर अवलंबून आहे (सगळं).
१४) Who broke the mirror? आरसा कोणी फोडला?
~Ididn’t. मी नाही फोडला.
१५) May I come in? आत येऊ का? फैजाम. –
Please do.या.
१६) Should I invite Rahul? राहूलला आमंत्रण देऊ का?
Please don’t. Last time we invited him he had come with ten of his friends.
नको बरं त्याला – मागच्या वेळेस आपण त्याला आमंत्रण दिलं तेव्हा तो त्याच्या दहा मित्रांसोबत आला होता.
१७) Give me your pen. तुझा पेन दे मला. Here it is. हा घे.
१८) Give that book to me. मला ते पुस्तक दे. No, I will not. नाही, मी देणार नाही.
१९) I didn’t have any money. माझ्याकडे काहीच पैसे नव्हते.
But what has that (got) to do with it? That doesn’t mean you should steal my money.
पण त्याचा काय संबंध? त्याचा अर्थ तू माझे पैसे चोरावे असा तर होत नाही?
२0) I thought I should tell you I saw your son smoking today.
मला वाटलं तुम्हाला सांगणं माझं काम आहे की तुमच्या मुलाला आज मी धूम्रपान करताना पाहिलं.
~ Mind your own business, would you? तुम्ही तुमचं काम बघा, काय?
२१) I am going to marry after a year when I’ll have a dozen cars and half a dozen bungalows.
मी एका वर्षानंतर लग्न करणार आहे जेव्हा माझ्याकडे एक डझन कार्स आणि अर्धा डझन बंगले असतील.
Dream on! स्वप्न पाहत रहा/पाहणं सुरू ठेव.
२३) I think if you worked harder you should be able to finish this job within a week.
मला वाटतं तू जास्त मेहनत घेतली तर तू हे काम एका
आठवड्याच्या आत संपवू शकायला पाहिजे.
That is easier said than done. बोलणं सोपं आहे.
२४) Did you pass? तू पास झालास का?
– No, I failed. नाही, नापास झालो.
२५) Is she coming tonight? ती आज रात्री येत आहे का? ~Thave no idea. मला कल्पना नाही.
२६) Shall we walk to the bus-stand? आपण बस-स्टॅण्डला चालत जायचं का? How far away is it?
२७) What is your favourite colour? तुझा आवडता रंग कोणता आहे? आहे?
२८) Did it hurt? दुखलं का? Not at all, I didn’t feel a thing. अजिबात नाही. मला काहीच जाणवलं नाही.
२९) Is something wrong with you? काही झालंय का तुला?
– No, no, nothing is wrong, everything is just fine, thanks. नाही, नाही, काही झालं नाही. सगळं एकदम छान आहे.
३०) Can you meet me at seven o’clock? तू मला सात वाजता भेटू शकतोस का?
-Yes, (there is no problem. हो, चालेल/हो, काही हरकत नाही.
३१) Could I ask you one personal question? मी तुला एक वैयक्तिक प्रश्न विचारू का? ~Of course, go ahead. अगदी, विचार.
३२) Would you like coffee or tea? आपण चहा घ्याल की कॉफी? Either would do fine. काहीही चालेल. जोरमाराचा
३३) More vegetables? आणखी भाजी (देऊ)?
~No, thanks, my plate is already full. नको. हं, माझी प्लेट आधीच भरलेली आहे.
३४) What’s your new school like? तुझी नवीन शाळा कशी आहे?
~ Oh, it is great. खूप छान आहे.
३५) How are you feeling now? तुला आता कसं वाटत आहे?
३६) How much rice should I cook? किती भात शिजवू?
~ Oh, a couple of handfuls will be enough. एक दोन मुठी बस होतील.
३७) What are you doing here? तू इथे काय करत आहेस? Me? nothing, just killing time.
मी? काहीच नाही – असाच वेळ घालवतोय.
३८) Would you make me a coffee? माझ्यासाठी एक कॉफी करशील का?
There is no coffee – shall I get you a cup of tea instead? कॉफी नाही आहे. चहा आणू का त्याऐवजी?
३९) Where does it hurt exactly? नेमकं कुठे दुखतय. – -Just here. बरोबर इथे. Great! छान/मस्त.
४०) Stop laughing. हसणं बंद कर.
I can’t help it. आवरत नाहीये मला हसू.
४१) I think we need to change our plan. मला वाटतं आपण आपली योजना बदलायला पाहिजे.
How do you mean? कसं म्हणतोस तू?/कसं बरं?
४२) Can you wait a few minutes? तू थोडी वाट पाहू शकतोस का?
Yes, I am not in a hurry. /I am in no hurry. हो, मला काही घाई नाही.
४३) I will return your book on Monday. मी तुझं पुस्तक सोमवारी परत करतो.
~ That’s all right/That’s okay, there is no hurry. ठीक आहे, काही घाई नाही.
४४) Do you like fried food? तुला तळलेलं अन्न आवडतं का?
~ Yes, very much / Yes, I love it. हो, खूपच.
४५) How long did you stay in Mumbai? तू मुंबईत किती वेळ राहिलास?
~Istayed there (for) a week. मी तिथे आठवडा राहिलो. “
४६) Here is your pen. हा घे तुझा पेन.
~ Thanks bro/Thanks mate. धन्यवाद भाऊ / मित्रा.
४७) How much will it cost to paint this house? हे घर रंगवायला किती खर्च येईल?
– Rs. 5000 max. जास्तीत जास्त ५००० रुपये.
४८) Will the cupboard fit in here? कपाट इथे येईल का?
~ Just a minute – let me measure it. एक मिनिट – मोजून बघतो.
४९) How far is Mumbai from here? मुंबई इथून किती दूर आहे?
~ It is 850 kms away. ५८० कि.मी. आहे.
५०) How tall are you? / What is your height? तुझी उंची किती आहे?
~l am six feet tall. सहा फुट आहे.
५१) How much do you weigh? तुझं वजन किती आहे?
-I weigh 90 kilos/ My weight is 90 kilos / (I am) 90 kilos. ९० किलो आहे.
५२) How old are you? / What is your age? तुझं वय काय आहे?
l am 28 किंवा I am 28 years old. २८ वर्ष.